उमरगा (प्रतिनिधी)-  शहरातील पाईपलाईन सतत नादुरुस्त होत असल्याने शहराला पाणी पुरवठ्यासाठी चांगल्या नळयोजनेची गरज होती. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उमरगेकरांची गरज ओळखुन शहरासाठी 185 कोटी रुपयाची समांतर पाणीपुरवठा योजना मंजुर करून आणली. तालुक्याच्या विकासासाठी  भरघोस निधी आणला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विकास कामांच्या व जनसामान्यांच्या पाठिंब्यावर माझा शिष्य चौथ्यांदा गुलाल उधळणार असल्याचे मत माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्र शासन व नगर विकास विभागाच्या अंतर्गत अमृत 2 या महाभियानांतर्गत उमरगा शहरात 185 कोटी रूपयाच्या समांतर पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र शिंदे  अध्यक्षस्थानी होते.

आमदार ज्ञानराज चौगुले, युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, डॉ. चंद्रकांत महाजन, शहाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जाफरी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मी तालुक्याचा विकास करण्यासाठी मोठा विकासनिधी आणला आहे. येणाऱ्या काळातही नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे. 

यावेळी डॉ. चंद्रकांत महाजन यांचे भाषण झाले. अध्यक्षीय समारोप जितेंद्र शिंदे यांनी केला. मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्यासह नगरपरिषद व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

यावेळी उमरगा बार असोसिएशन अध्यक्ष ॲड.कोथिंबरे, ॲड.प्रविण तोतला, सिद्रामप्पा चिंचोळे,  ळीिराम सुरवसे, जगन्नाथ पाटील, डॉ. उदय मोरे, बालाजी सूरवसे, हंसराज गायकवाड,  बप्पा हराळकर, शहाजी चालुक्य, रत्नकांत सगर, शंतनू सगर, सुशील दळगडे, नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top