धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 25 ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज सादर करण्याच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात 12 उमेदवारांनी 12 नामांकन अर्ज दाखल केले. तर 60 निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 112 नामांकन अर्ज खरेदी केले.
240 - उमरगा विधानसभा मतदारसंघात 11 अर्जदारांनी 18 नामांकन अर्ज खरेदी केले.तर कोणत्याही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही. 241 - तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवारांनी 3 नामांकन अर्ज दाखल केले. यामध्ये अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे, अमर शेख व योगेश केदार यांचा समावेश आहे. तर 20 अर्जदारांनी 31 अर्ज खरेदी केले.
243 -परंडा विधानसभा मतदारसंघात 3 अपक्ष उमेदवारांनी आणि राहुल मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांनी अर्ज दाखल केला. तर 9 अर्जदारांनी 13 अर्जाची खरेदी केली.