धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाई करीत साडे पाच लाख रूपयांची कॅश तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पकडली आहे. विधानसभा निवडणूक सुरू असल्याने अनेक ठिकाणी तपासणी नाके व पथके तैनात करण्यात आली आहेत. तामलवाडी येथे तपासणीत एक गाडीत ही कॅश सापडली आहे.
पोलिस व निवडणूक आयोग याची पडताळणी करीत असून, कॅश जप्त करण्यात आली आहे. ही कॅश कर्नाटक येथील व्यापारी यांची असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. निवडणूक आचारसंहिता काळात एका व्यक्तीला 50 हजार पेक्षा अधिकची रक्कम जवळ बाळगता येणार नाही. त्यापेक्षा अधिक रक्कम सापडल्यास ती जप्त करण्यात येणार असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.