धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्य़ातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने शासनाच्या शिक्षणाच्या चुकीच्या धोरणांविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला.. याप्रसंगी दि. 15मार्च चा शासन निर्णय हा राज्यातील सर्व जि. प. शाळा कायमच्या बंद करण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेला आहे. त्याचा तीव्र निषेध राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी केला आहे. तो निर्णय रद्द करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले होते.
त्याप्रसंगी समन्वय समितीच्या वतीने लालासाहेब मगर, यांच्या नेतृत्वाखाली राज्य कार्यकारिणी सदस्य बशीर तांबोळी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, सुरेश भालेराव, अविनाश मोकाशे,कैलास मोहिते, शिवाजी साखरे राजाभाऊ अकोसकर, सविता पांढरे, मालोजी वाघमारे, बब्रुवान भोसले, युवराज पिंगळे, दत्तात्रय लोहार, मिलिंद जानराव,बाचेवाड सर, विक्रम मगतराव यांच्या उपस्थितीत अप्पर उपजिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन देण्यात आले.