धाराशिव (प्रतिनिधी)- विचारांची शिदोरी या पुस्तकाचे नुकतेच ज्येष्ठ इतिहासकार लेखक आ.ह.साळुंके यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या बाबत पुस्तकाचे लेखक तथा पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव संचलित पर्यटन विकास समितीचे कार्याध्यक्ष रणजित रणदिवे यांचा सत्कार समितीच्या वतीने करण्यात आला.

रणजीत रणदिवे यांनी सर्वोत्तम भुमी पुत्र गौतम बुद्ध,बळीवंश, म-हाटा पातशहा, रावण, लोक माझे सांगाती, छत्रपती समाधीचा शोध व बोध, बोस बंधू, अशा अनेक पुस्तकाचे वाचन करुन त्यावरती अभिप्राय लिहिले व त्यातुनच विचारांची शिदोरी लिहिली गेली. या प्रेरणादायी विचार सरणीतुन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा गौरव म्हणुन पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव संचलित पर्यटन विकास समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार केल्याबद्दल लेखक इंजि.रणजीत रणदिवे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी समितीचे अध्यक्ष युवराज नळे, सचिव देविदास पाठक, गणेश वाघमारे, अभिमान हंगरगेकर, अब्दुल लतिफ, बाबासाहेब गुळीग, इतिहासकार रविंद्र शिंदे, विजय गायकवाड, डॉ रविराज पाटील, भागवत घेवारे सह इतर उपस्थित होते.


 
Top