तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर -डकवाडी रस्ता पावसामुळे वाहून गेला आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर -डकवाडी रस्ता गेले दोन दिवस संततधार पावसामुळे वाहून गेला आहे.त्यामुळे नागरीकांना जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.जिल्हा परीषदेच्या बांधकाम विभाग अंतर्गत हा रस्ता येतो.जिल्हा परीषद बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.
तेर-डकवाडी रस्ता संततधार पावसामुळे वाहून गेला आहे.त्यामुळे नागरीकांना जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. -किशोर काळे,तेर