धाराशिव (प्रतिनिधी)-रुपामाता समूहाच्या सर्व शाखांमध्ये  शेतकरी व व्यापारी वर्गासाठी मालतारण कर्ज सुविधा उपलब्ध असून,  रुपामाता समूहाचे संस्थापक अँड. व्यंकटराव गुंड यांनी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या रूपामाता वेयरहाऊसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे धाराशिवसह औसा तालुक्यातील  शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला आहे.

बाजारपेठेत जेव्हा शेतीमालाला भाव नसतो त्यावेळेस रुपामाताच्या वतीने त्वरित मालतारण कर्ज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांची सोय झाली आहे.

या धर्तीवर तुळजापूर तालुक्यातील शेतकर्याोंसाठी धाराशीव तालुक्याप्रमाणेच देवसिंगा (तूळ) येथे  रुपामाता नँचरल शुगरच्या आवारात शेतकऱ्यांसाठी लवकरच वेअर हाऊसची उभारणी करणार असल्याचे श्री. गुंड यांनी बैठकीदरम्यान सांगितले.

रूपामाता उद्योग समूहाचे तुळजापूर मतदारसंघात शेतकरी व युवा संवाद अभियान सुरू असून कुंभारी ता. तुळजापूर येथे कार्यकारी संचालक अँड.अजित व्यंकटराव गुंड यांनी समूहामार्फत शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल वेयरहाऊसमध्ये  साठवणूक करावी व योग्य भाव आल्यास विक्री केल्यास अधिक लाभ हाऊस शकतो असे सांगितले. यावेळी सदरील गावातील शेतकरी व्यापारी युवक व सामाजिक कार्य सामाजिक कार्यकर्ते संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top