वाशी (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. विद्यालय शासनाकडून तीन लाख रुपयांचे बक्षीस मिळण्यास पात्र झाले आहे. तसेच जिल्हास्तरीय मूल्यांकनासाठी निवड झाली आहे.

वाशी तालुक्यातून प्रथम आलेल्या छत्रपती शिवाजी विद्यालयास जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने भेट दिली. या समितीमध्ये इनामदार, गटशिक्षणाधिकारी तुळजापूर, मिलिंद अघोर, अधिव्याख्याता डायट धाराशिव माळी एस.एस., शिक्षण विस्ताराधिकारी अंकुशे, साधनव्यक्ती तुळजापूर दत्तात्रय मोहिते, केंद्रप्रमुख इंदापूर यांचा समावेश होता.

या समितीने विद्यालयातील विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, इंग्रजी भाषिक कौशल्ये तपासली. समितीने विद्यालयातील प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे मूल्यांकन केले. विद्यालयाचे व्यसनमुक्ती अभियान, साक्षरता प्रचार व प्रसार, शालेय स्वच्छता, शालेय आरोग्य आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.

अभियानातील या यशाबद्दल सोमनाथ घोलप गटशिक्षणाधिकारी वाशी, विद्या टेकाळे शिक्षणविस्ताराधिकारी, सयाजी माने नगरपंचायत वाशी ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.व्ही. गाढवे व पर्यवेक्षक बी.एम.सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. अभियानातील मूल्यांकनातील विविध बाबींची पूर्तता व तयारी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक ए.बी.वाघेरे, एस.व्ही.क्षीरसागर व  एस.बी.छबिले यांनी परिश्रम घेतले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे योगदान लाभले.

विद्यालयाने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडख बार्शी या संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी.टी.पाटील, सहसचिव अरूण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शालेय समितीचे चेअरमन टी.पी.शिनगारे तसेच संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी अभिनंदन केले आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीप कवडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नेताजी नलवडे, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  एस.व्ही.गाढवे, पर्यवेक्षक बी. एम.सावंत, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


 
Top