धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील थोडसरवाडी येथील ज्ञानेश्वर भुतेकर  यांना जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने कला, क्रीडा, सामाजिक, इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल धाराशिव जिल्हा युवा पुरस्कार 17 सप्टेंबरला धाराशिव येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्हाचे पालकमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्माचिन्ह देऊन थोडसरवाडी येथील ज्ञानेश्वर भुतेकर व त्यांच्या परिवाराचा यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मैनिक घोष, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, क्रीडा अधिकारी अक्षय बिराजदार, क्रीडामार्गदर्शक डिंपल ठाकरे, ॲथलेटिक्स प्रशिक्षक योगेश थोरबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top