धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मराठायोध्दा  मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने आणि त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी पुकारलेल्या बंदला  धाराशिव जिल्ह्यात मोठा प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, परंडा, वाशी आदी तालुक्यासह ग्रामीण भागात ही बंदचा जोर दिसुन आला.

बहुतांशी व्यापारी वर्गाने स्वखुशीने आपले दुकाने बंद केले होते. या बंद मधुन अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. शाळा, काँलेज बंद होते. शासकीय कार्यालय येथे तुरळक गर्दी होते. रस्त्यावर वाहनांची वर्दळ घटली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. बंद शांततेत पार पडला.


 
Top