भूम (प्रतिनिधी) - भूम शहरातील सराफ व्यवसायिक व बापू उंबरे यांच्या घरी चोराने हात साफ करून एका सायकल दुकानात चोरीचा प्रयत्न करून पोबारा केल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असल्याने तातडीने चोराच्या मुसक्या पोलिस प्रशासनाने आवळाव्यात अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की शहरात दिनाक 2 सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरांनी दोन ठिकाणी चोरी केली असून यामध्ये नंदू वेदपाठक यांच्या दुकानातून साधारण तीन किलो चांदी व बापू उपरे यांच्या घरातून 5 ते 6 ग्राम सोने व 12 हजार रोख रक्कम चोरली असल्याची माहिती सदरील चोरी झालेल्या सदस्यांनी दिली आहे. शहरातील मुख्य बाजार पेटे मध्ये नंदू वेदपाठक हे मागील अनेक वर्षापासून सोन्या चांदीचा व्यवसाय करत आहेत. सायंकाळी नेहमी प्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी रोज पहाटे वेदपाठक यांच्या आई दुकानासमोर झाडून घेण्यासाठी आल्या असता यावेळी दुकानाचे लॉक तुटल्याचे त्यांना दिसले. तातडीने त्यांनी याबाबत मुलगा नंदू वेदपाठक याना माहिती दिली. ही माहिती नंदू वेदपाठक यांनी पोलिस प्रशासनास कळवली. याची माहिती पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना कळताच त्यांच्या सह पोलीस उपविभागीय अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ यांनी घटना स्थळी भेट दिली. व पुढील कारवाही करण्यासाठी ठाणे अंमलदार याना सूचना करून. जिल्हा पोलिस प्रशासनाकडे शॉन पथक व ठसा तज्ञ याची मागणी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली . तातडीने शॉन पथक ही घटना स्थळी दाखल झाले. परंतु अवघ्या 2 किलोमिटर अंतरावर जाऊन शॉन गोठ मळले यामुळे. चोरीचा तपास करण्याचे मोटे आव्हान आत्ता पोलिस प्रशासनासमोर उभे राहिले आहे . गभिर्यची बाब म्हणजे जो चोर दुकानात चोरी करण्यासाठी गुसला होता त्याने दुकानातील चांदीचे दागिने ज्या शो केश मध्ये ठेवण्यात आले होते. ते शो केश फोडून चांदीचे दागिने पिशवी मध्ये भरले व हातचे ठसे पोलिसांना मिळू नयेत याकरिता सोबत असलेल्या कपड्याने पुसले आहेत. ही सर्व हकीकत दुकानातील सी.सी. टिव्ही मध्ये कैद झाली असून. याचे फुटेज ही दुकानदार यांच्या वतीने पोलिस प्रशासनास देण्यात आले आहेत. यानंतर चोराणे मोर्चा समोर असलेल्या सायकल दुकाना कडे वळवला परंतु दोन लॉक या दुकानाला असल्याने एक लॉक चोराला तुटले परंतु दुसरे लॉक त्याला सहज न तुटल्याने त्याने येथून मोर्चा काही अंतरावर राहत असलेल्या बापू उपरे यांच्या घराकडे वळवला. या ठिकाणी घराला बाहेरून कुलूप असल्याने त्याने घराचे लॉक तोडून घरात प्रवेश करत घरातील रोख रक्कम व दागिने यावर हात साफ केला आहे. विशेष म्हणजे केवळ एकाच चोरांना सदरील ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. यामधे दोन ठिकाणी चोराचा उद्देश साध्य झाला असून एक ठिकाणी त्याला चोरी करता आली नाही. पोलिस प्रशासनाने सराफ पेठ येथे दिवसातून एकदा व रोज रात्री गोलाई चौक ते बाजार पेठ येथे मध्य रातरी 2 नंतर पेट्रोलिंग केल्यास चोरीच्या घटनेला आळा बसेल. विशाल वेदपाठक कार्याध्यक्ष समिती महाराष्ट्र राज्य घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट दिली असून चोराच्या मुसक्या आवळण्यासाठी पुढील तपास तातडीने सुरू केला आहे.

 
Top