भूम (प्रतिनिधी)-भूम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय जिल्हाधिकारी मार्फत माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद धाराशिव यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनामध्ये भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघ सततच्या पावसामुळे कमीजास्त अथवा मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अतोनात शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्या झालेले नुकसानीच्या भरपाई म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून हेक्टरी 50  हजार रुपयाची तात्काळ मदत करण्यात यावी. 2023-24 चा राहिलेला पिक विमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात यावी. यासह अनेक मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रुपेश आप्पा शेंडगे, भूम शहराध्यक्ष मंमू पटेल, बादशाह शेख, फिरोज बागवान, दादासाहेब मार्कड, तानाजीराव पाटील, अशोकराव टिपे, राम सावंत, प्रभाकर डोंबाळे, बबन शाळू आदी उपस्थित होते.

 
Top