भूम (प्रतिनिधी)-अरविंद शिंदे काल झालेल्या पावसामुळे तालुक्यातील खरीप हंगामातील तब्बल 46 हजार 527 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनसह इतर पिके धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तर उडीद पिक काढणीला आले असल्याने सतत पडणाऱ्या पावसामुळे उडीद काढताना अडचणीत असून पावसामुळे नुकसान होत आहे.
यावर्षी मान्सुन वेळेत दाखल झाल्याने 46 हजार 527 ट्रॅक्टरवर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली होती. मागील महिन्यातील वातावरणामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे पिके पिवळी पडून वाया जात होते. तर आता सतत पडत असलेल्या पावसाने पिकाला फवारणी करताना अडचण निर्माण होत आहे. आता पडलेल्या पावसाने पिकामध्ये पाणी साचून राहत आहे त्यामुळे पिकाची वाढ होत नाही. त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होणार असून उत्पादन कमी होणार आहे .तालुक्यातील बहुतांश मंडळात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने काय ठिकाणी पिकात पाणी असल्याने पिके पिवळी पडली आहेत आणखीन काही दिवस हेच वातावरण कायम राहिल्यास खरिपाचे मोठे नुकसान होणार असल्याचे शेतकरी सांगतात .यावर्षी वेळेत पेरण्या झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांमधून चांगल्या आर्थिक उत्पन्न हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांना लागली होती परंतु पावसाने असे रोद्र रुप धारण केले. तर खरीप हंगामातील पिके वाया जातात की काय ही चिंता शेतकऱ्याला लागली आहे.
यावर्षी तालुक्यात 41 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. उर्वरित हेक्टर वर उडीद मका तूर या पिकांची पेरणी झाली आहे. पाऊस वेळेवर झाल्याने पिकांची वाढ चांगली होती. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील अनेक मंडळात सोयाबीन व इतर पिकात पाणी साचल्याने सोयाबीन सह इतर पिके पिवळी पडत आहे. ऐन शेंगा परिपक्व अवस्थेत पिके असतानाच हा फटका बसल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर वरील पिके धोक्यात आले आहे.
जून ते सप्टेंबर पर्यंत पडलेला सरासरी पाऊस
आंबी - ४३७ . ८ मिमी, माणकेश्वर - ५५२ . ३ मिमी, भूम- ४०६ . ९ मिमी, वालवड - ५७५ .८ मिमी, ईट - ६६२ . ६ मिमी, भूम ग्रामीण - ५२७ . ७ मिमी.