तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून आमरण उपोषणाला बसलेले तेर येथील तानाजी पिंपळे यांनी 25 सप्टेंबरला उपोषण स्थगित केले आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर येथे 23 सप्टेंबरला तानाजी पिंपळे आमरण उपोषणाला बसले होते.मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण स्थगित केल्याने तानाजी पिंपळे यांनी आमरण उपोषण स्थगित केले.यावेळी तहसीलदार मृणाल जाधव यांनी तानाजी पिंपळे यांना नारळपाणी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.