तुळजापूर  (प्रतिनिध)-  महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समितीने आपल्या न्यायी पुकारलेल्या  कामबंद आंदोलनला तुळजापूर येथे शंभर टक्के प्रतिसाद लाभला. 

ऐन सणासुदीत या आंदोलनाचा फटका हा भाविक प्रवाशांन सह शालेय विद्यार्थी, परगावी नोकरी जाणाऱ्या नोकरदारांना बसला. मात्र परराज्यातील बससेवा मात्र चालू आहे. कर्नाटक, आंध्र, तेलगणा, गोवा या राज्यातील बसेस माञ चालु होत्या. माञ यात प्रचंड गर्दी झाली.

या काम आंदोलनाचा लाभ खाजगी वाहन चालकांनी प्रवाशांन कडुन जादा दर आकारुन घेतला. या आंदोलन मुळे तुळजापूर बसआगाराचे सुमारास आठ लाखाचे  एक दिवसाचे  उत्पन्न बुडुन झाला. या आंदोलनात चालक वाहक सह अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला यात चालक 161 व वाहक 190 यांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने तुळजापूर बस आगाराचा ऐंशी गाड्या जागेवर थांबल्या होत्या. यामुळे जाणाऱ्या 220 व येणाऱ्या 222 फे-या रद्द कराव्या लागल्या.

 
Top