तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक लाडक्या बहीणीनी भरुन गेल्यामुळे इतर बँकेच्या कामांसाठी आलेल्या बँक ग्राहकांना याचा फटका बसत आहे.
त्यातच मंगळवारी सकाळी बँकेचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे बँक व्यवहार थाबल्याने याचा सर्वानाच फटका सहन करावा लागत आहे. सध्या बँकांच्या विविध काऊंटर वर फक्त आणि फक्त महिलांचीच गर्दी होत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहीणीची पैसे काढण्यासाठी एकच गर्दी होत आहे. शासनाच्या लाडक्या बहीणींचे पैसे मिळण्यासाठी विविध कामे म्हणजे केवासी, पैसे काढणे आदी कामांसाठी लाडक्या बहीणींची मोठी गर्दी होत आहे. यामुळे पुरुषांना ताटकळत बँकेत बसावे लागत आहे. रांगेत थांबुन कंटाळलेल्या लाडक्या बहीणी चक्क बँकेत ठाण मांडुन बसत आहेत. यासाठी पर्यायी यंञणा उभी करुन सेव्हींग वाले इतर ब़ँक ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.