कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील राजाभाऊ गुजर ते जयद्रत वाघमारे यांच्या शेतातील मजबुतीकरणाचे काम रोजगार हमी योजनेमार्फत झाली आहे. सदरील रस्त्याच्या कामात नियमाप्रमाणे खडी अंतरली नसून मुरूम कमी प्रमाणात वापरला आहे काही ठिकाणी तर खडी न टाकताच मुरूम टाकला आहे. या रस्त्याची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असून हा रस्ता साधू मंदिर पासून गेल्यामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हा रस्त्यावर श्री संत साधू बुवा महाराज यांचे श्री संजीवन समाधी स्थळ असल्याने तीर्थक्षेत्र विकास क वर्ग अंतर्गत मंदिरात प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीस भजन कीर्तन, अन्नदान आदी कार्यक्रम महाशिवरात्री सप्ताहाचा खूप मोठा उत्सव कार्यक्रम असतो व या यात्रा महोत्सव होत असल्यामुळे या रस्त्याने लहान मुले, वयस्कर, वृद्ध पुरुष आणि भाविकांची मोठी मांदियाळी असते. या रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे होणे गरजेचे असतानाही या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने केले असल्यामुळे या कामाची चौकशी करावी अशी मागणी श्री संत योगी साधू बुवा महाराज मंदिरचे विश्वस्त मंडळाचेचे अध्यक्ष नारायण शामराव दशंवत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच यातील दोषीवर कारवाई न झाल्यास 13 सप्टेंबर पासून कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचाही इशारा यावेळी या निवेदनात देण्यात आला आहे.