तुळजापूर  (प्रतिनिधी)-शिक्षक दिनाचे औचित्य साधून तुळजाई सांस्कृतिक व क्रीडा मंडळ तुळजापूर खुर्द  यांच्यातर्फे नगर परिषद शाळा क्रमांक 2 व 3 मधील शिक्षकांचा त्यांचीच प्रतिमा, डायरी, पेन आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माझी शाळा माझे गुरुजी या शासनाच्या उपक्रमाची अंमलबजावणी करत तुळजाई मंडळांने शाळेतील शिक्षकांना त्यांचीच प्रतिमा वर्गात लावण्यासाठी भेट दिली. दरवर्षी अनेक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या *तुळजाई मंडळांने* यावर्षी देखील या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करून पालिकेच्या शिक्षकांचा शिक्षकदिनी सत्कार केला.

प्रारंभी युवा नेते विनोद गंगणे, मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मा.उपनगराध्यक्ष पंडितराव जगदाळे,जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे, राजाभाऊ देशमाने, मा. शिक्षण सभापती मंजुषाताई देशमाने, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लक्ष्मीताई रणजीत भोजने, संचालिका लक्ष्मी निलेश एकदंते, खंडू ताटे सर, संजय देशमाने, सूर्यभान ढवळे,आदिनाथ ठेले यांच्यामार्फत नगर परिषद शाळा क्रमांक 2 आणि 3 मधील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 ला अत्याधुनिक अशी म्युझिक सिस्टीम मंडळाच्या वतीने भेट देण्यात आली.

यावेळी तुळजाई सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ऍड.बालाजी देशमाने,उपाध्यक्ष नानासाहेब भोजने, सचिव विकास भोजने,सहसचिव विवेक माहुले,कोषाध्यक्ष रामेश्वर ठेले,सदस्य हनुमंत साबळे,आलिमशेख यांच्यासोबत रणजीत भोजने  शाळा व्यवस्थापन समितीतील शिक्षण तज्ञ भगवान सुरवसे,ऍड.प्रतीक जगदाळे, सुरज जगदाळे,रविकिरण शेरेकर,धीरज देशमाने,संकेत भोजने शाळा क्रमांक 2 चे मुख्याध्यापक गणेश रोचकरी, बाळासाहेब जेटीथोर, महेंद्र पाटील महेंद्र कावरे, सुरज मल शेटे   शाळा क्रमांक 3 चे मुख्याध्यापक श्री तुकाराम मोटे, निर्मला कुलकर्णी, युवराज मगर, अशोक शेंडगे, सतीश यादव, जालिंदर राऊत, पुष्पा काळे, शरद कोळगे, वैशाली गोमारे,रंजीत नाईकवाडे,अतुल काकडे, अनिल राठोड, कल्पना व्हटकर, रेणुका जाधव इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शेंडगे यांनी तर आभार पंडितराव जगदाळे यांनी मांडले.


 
Top