धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ, मानाचा गणपती व धाराशिव चा महाराजा म्हणून गणल्या गेलेल्या या मंडळाच्या वतीने आज निवासी जिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांच्याकडे लेखी निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर महिलांच्या वर अन्याय ,अत्याचार, जुलूम, दैनंदिन कालावधीमध्ये होतो आहे. बालिकेवर दुष्कर्म करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी व जलद न्यायालयात न्याय मिळण्यासाठी खटला  चालविण्यात यावा .याबाबतचे निवेदन देण्यात आले. 

महाराष्ट्रात महिला व मुली सार्वजनिक जीवनामध्ये व शालेय महाविद्यालयीन शिक्षणक्षेत्रात अनेक प्रकारचा अत्याचार जुलूम होत असताना. प्रशासनाकडून सुरक्षितता व संरक्षण याकडे दुर्लक्ष आहे. शिक्षण व सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी  ,चौकाचौकांमध्ये विविध प्रकारच्या कॉमेंट्स ,मोबाईल मधून विविध प्रकारचे द्विअर्थी गाणी लावून मोटार सायकल वर तरुणाई हिंडते आहे .याचा दुष्परिणाम महिलांच्या सक्षमीकरणावर व महिलांच्या विविध सुप्त कलागुणांना अडसर निर्माण करीत आहे. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री यांनी पूर्णपणे लक्ष घालून बंदोबस्त करण्यात यावा. अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे

 गणेश मंडळाच्या वतीने व महिला मंडळाच्या वतीने अत्याचारी नराधमास फाशी द्या मंडळाने स्वसंरक्षणार्थ मुलींच्या व मुलांच्या साठी लाठी प्रशिक्षण सुरू केले आहे. निवेदन शोभा जाधव निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रा. गजानन गवळी ,बाबा तीर्थकर, श्रीकांत दिवटे ,नंदकुमार हुच्चे, सागर पाळणे, मनोज अंजीखाणे,राहुल गवळी  यांनी जाधव यांना स्वामी विवेकानंद यांच्या विचाराची ग्रंथ भेट देण्यात आला. नूतन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनाही स्वामी विवेकानंदांचा ग्रंथ भेट देण्यात आला.

 
Top