धाराशिव (प्रतिनिधी)- मराठी शाळेचा शिक्षक कणा असून धाराशिव जिल्ह्यामध्ये जि. प. शाळाच गुणवत्तेमध्ये अग्रक्रमावर आहेत. यामुळे सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे गौरवोद्गार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर यांनी काढले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी 5 सप्टेंबर रोजी शिक्षकांचा सन्मान केला यावेळी ते बोलत होते.

धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गट यांच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षकाचे शिक्षक दिनानिमित्त सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा शाल, पेन, पुष्प व छत्रपतींची मुर्ती देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी देवगुडे, जि. प. शिक्षक चंदणे, बोबडे, संतोष बाकले, भगवान वाघमारे, सुग्रीव घोगरे, इथाले, गादेकर, जामगावकर, लोंढे, सुधीर देशमुख, रमेश चव्हाण, धनंजय अनपट, श्रीमती डुमणे, माळी, ससे, सोळुंके, कोळी, आटपळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बळवंत घोगरे तर आभार चंदने मानले.

 
Top