परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दिनकर पवार हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ सदस्य अब्दुल गनी हन्नुरे, लोकमंगल बॅकेचे व्यवस्थापक अतुल माळी,दत्ता शिंदे, संतोष गवंडी हे होते.

प्रारंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी लोकमंगल बँके तर्फे अतुल माळी, दत्ता शिंदे व संतोष गवंडी यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा  पुष्पगुच्छ प्रमाणपत्र, श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला प्रशालेच्या विद्यार्थीनी कुमारी पौर्णिमा  सिरसकर,  सिद्दीका चौधरी, हुमेरा शेख, श्रावणी शिंदे यांनी शिक्षक दिनानिमित्त भाषणे व काव्यगायन केले.प्रशालेच्या शिक्षिका शुभांगी देशमुख, मिनाक्षी मुंडे साबिया तांबोळी आबासाहेब माळी यांनी शिक्षक दिनानिमित्त भाषणे केली.

भाऊसाहेब सुर्यवंशी यांनी शिक्षक हा सामाजिक अभियंता असून प्राचीन काळापासून शिक्षकाला अनन्यसाधारण महत्व असल्याचे नमूद केले. दिनकर  पवार यांनी शिक्षक दिनाचे विद्यार्थ्यांना महत्व सांगितले. अब्दुल गनी हन्नुरे यांनी शिक्षकांची समाजातील भूमिका विशद केली. प्रशालेच्या विद्यार्थिनी विद्या माने व राफीया बहिरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक अरबिना सय्यद हिने केले. तर आभार प्रदर्शन आबासाहेब माळी यांनी केले.

 
Top