उमरगा (प्रतिनिधी)- लातूर येथील दयानंद महाविद्यालयातील प्रा. डॉ. विवेक बाबूराव झंपले (वय 37) यांचे गुरुवारी, (दि 05) सकाळी साडे सहाच्या सुमारास लातूर येथे खाजगी रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी भाऊ, भावजय आणि मोठा मित्र परिवार आहे. उमरगा तालुक्यातील मुळज या त्यांच्या मूळ गावी शेतात दुपारी चार च्या सुमारास पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 
Top