परांडा (प्रतिनिधी) -मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव असून तो प्रत्येक वर्षी उत्साहात साजरा करतो. स्वतंत्र मराठवाड्याच्या मुक्तीसाठी ज्या महापुरुषांनी बलिदान दिले त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी आपण या दिवशी त्यांची प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करून हा दिवस साजरा करतो. असे मत येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल जाधव यांनी व्यक्त केले.
परंडा येथे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने, स्टाफ सेक्रेटरी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभणे , कार्यालय अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे व महेश पडवळ यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख यांनी मानले.