धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयातील सहाय्यक  प्राध्यापक डॉ. संजय आंबेकर यांना नुकतीच युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका या विद्यापीठाने डि.लीट. ही मानक पदवी बहाल करून सन्मानित केले.

यापूर्वी डॉ. संजय आंबेकर यांनी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील 15 शोधनिबंधाचे सादरीकरण व प्रकाशन, दोन ग्रंथाचे लेखन, आकाशवाणीवर विविध विषयावर मुलाखती, आणि विद्यापीठाच्या विविध समित्यांवर कार्य केले आहे. त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना विधी विषयातील पी.एचडी.चे संशोधक मार्गदर्शक म्हणून त्यांची निवड केली आहे.

डॉ. आंबेकर यांनी धाराशिव येथील जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण येथील विविध समित्यांवर कार्य केलेले आहे. विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. या यशाबद्दल श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्य  शुभांगी गावडे, मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कोल्हापूर विभागप्रमुख  श्रीराम साळुंखे, मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य नानासाहेब पाटील, प्राचार्य डॉ.कायला कृष्णा मूर्ती आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

 
Top