धाराशिव (प्रतिनिधी)- गुरुवर्य के.टी. पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या बाल चित्रकला स्पर्धेत शहरातील 3472 विद्यार्थ्यांचा सहभाग येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर धाराशिव मध्ये गुरुवर्य के.टी. पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील इयत्ता 1 ली ते 4थी च्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत धाराशिव शहरातील विविध माध्यमांच्या 22 शाळांमधील तब्बल 3472 विद्यार्थ्यांनी आपला  सहभाग नोंदवला. 

नूतन प्राथमिक विद्यामंदिरच्या प्रांगणामध्ये घेण्यात आलेले या स्पर्धेच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी  आदित्य  पाटील  , प्रशालेचे मुख्याध्यापक  प्रदिपकुमार गोरे , शिवकुमार लगाडे , आयडियल स्कूलच्या प्राचार्य श्रीमती ज्योती आघाव, आदर्श प्राथमिकचे लोमटे, फ्लाईंग किड्सच्या श्रीमती घोलप,श्री श्री रविशंकर प्राथमिकच्या श्रीमती अस्मिता नलावडे, श्रीमती पडवळ, कर्मवीर बालमंदिरचे नवनाथ सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नूतन प्रशालेच्या वतीने शहरातील स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध शाळांच्या प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून प्रथम - 3000 रुपये, द्वितीय - 2000 रुपये, तृतीय - 1000 रुपये, उत्तेजनार्थ 500 रूपयांची दोन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नूतन प्रशालेतील संजय जाधव, रामराजे पाटील, संतोष माळी, प्रवीण गोरे, रमेश वागतकर, श्रीमती दिपाली राऊत, श्रीमती ऋतुजा झाडे, श्रीमती अश्विनी बुकन, श्रीमती सारिका उमरकर, ज्ञानेश्वर कोळगे यांनी सहकार्य केले.

 
Top