धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, धाराशिव आयोजित जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा, 17 वर्षे वयोगटातील क्रिकेट स्पर्धा फ्लाइंग किड्स इंटरनेशनल इंग्लिश स्कूलच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आले होते.  फ्लाईंग किड्स शाळेचे क्रिडा प्रशिक्षक इंद्रजित वाले मार्गदर्शनाखाली फ्लाईंग किड्सच्या मुलींचा संघ जिल्हास्तरावर विजयी ठरला असून, विभागस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर  पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, फ्लाइंग किड्सच्या संचालिका डॉ. मंजुळा पाटील तसेच सर्व शिक्षक- पालकवर्ग यांनी विजयी संघाचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 
Top