तुळजापूर (प्रतिनिधी)- कुमारी दिव्या शिंदेचा आदर्श ग्रामीण भागातील मुला मुलींनी घ्यावा, असे आवाहन माजी सभापती शिवाजी गायकवाड यांनी केले. दिव्या प्रभाकर शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल वाडी बामणी येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रमात केले.
यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली दिव्या खडतर परिश्रम घेऊन उत्तुंग यश मिळवलेले आहे. त्यासोबतच तिच्या आई-वडिलांनी व गुरुजनानीसुद्धा कष्ट घेतलेले आहेत तेही तितकेच अभिनंदन साठी पात्र आहेत. तिचा आदर्श गावातील मुला मुलींनी घेऊन तिच्यासारखेच अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न करावेत. सत्काराला उत्तर देताना दिव्या शिंदे म्हणाले की, मी माझ्या सर्विस मध्ये सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन तसेच विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा सराव करावा. त्यामुळे त्यांना त्याचा पुढे फायदा होईल. यावेळी तुळजापूरचे युवा नेते ऋषिकेश मगर, राजेंद्र पाटील, उपसरपंच अमर माने, पंचायत समितीचे माजी सदस्य युवराज पानथरे यांनीही मार्गदर्शन केले. त्यांच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांच्या शाळेच्या व मान्यवर पाहुण्यांच्या वतीने यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रभाकर शिंदे, शोभा शिंदे, आनंद थिटे, बबन जाधव, बाळासाहेब कदम, चिन्मय मगर, धावारे, गरड, शाहूराज मोठे, श्रीमती वरुडकर, श्रीमती शिंदे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन रणजीत पाटील यांनी मानले.