तुळजापूर (प्रतिनिधी) -  महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदिरातील तीन व घाटशिळ शिखरे शारदीय नवराञ महोत्सवापुर्वी रंगाने उजळुन निघणार आहे. 2014  नंतर  तब्बल दहा  वर्षा नंतर श्रीतुळजाभवानी मंदिरातील शिखरांना रंगकाम केले जात आहे. चार शिखरासाठी आठ लाख पंचाऐंशी हजार रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे समजते.

श्रीतुळजाभवानी मंदिरात मुख्य प्राचीन असे तीन शिखर आहेत. तर एक घाटशिळ मंदिरावर एक शिखर आहे. त्यात श्रीतुळजाभवानी मातेचे वास्तव्य असणाऱ्या गर्भगृहावरील, भवानी शंकर, होमकुंड हे वरील तीन मुख्य शिखर आहेत. या तिन्ही शिखरांच्या रंगरंगोठी काम चालु करण्यात आले आहे. या शिखरांना  आकर्षक पध्दतीने दर्जदार ऊन वारा पाऊस सहन करुन कायम तेजेदार दिसणारा रंग दिला जात आहे. शिखर रंगकाम श्रीतुळजाभवानी शारदीय नवराञ महोत्सवापर्यत पुर्ण केले जाण्याचे प्रयत्न चालु आहेत.

श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरातील विविध छबिना वाहनांची रंगरंगोठी केली जात आहे. श्रीतुळजाभवानी मातेच्या छबिना वाहनांची रंगरंगोठी सुरु असुन हे काम अंतिम टप्प्यात आहे. छबिना वाहनांची दरवर्षी रंगरंगोठी केली जाते.

 
Top