तुळजापूर (प्रतिनिधी)- जय तुळजाभवानी माता केंद्रीय प्राथमिक आश्रम शाळा तुळजापूर येथे गोरगरीब दिन दलीत अनाथ विद्यार्थ्यांसाठी शाळेला गणवेश वाटप सौ सायली विनायक देशमुख यांच्यातर्फे मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. त्यासाठी पुजारी प्रमोद प्रतापराव कदम यांच्या हस्ते मुलांना गणवेश वाटप करण्यात आले.
पुणे येथील रहिवासी असलेले अभिषेक गंगाधर सोनवणे हे देवी दर्शनासाठी कदम यांच्याकडे आले होते. त्यांना आश्रम शाळेसाठी काहीतरी देणगी देण्याचे सुचले व त्यांनी आश्रम शाळेला भेट दिली आणि त्या भेटीनंतर त्यांनी मुलांसाठी गणवेश वाटप करण्याचा संकल्प केला. 11 हजार रुपये देऊन 61 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केला. अभिषेक सोनवणे यांच्या आई तसेच पत्नी शाळेला भेट देऊन शाळेची सर्व मुलांशी संवाद साधला. शाळा पाहून त्यांना खूप आनंद वाटला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद प्रतापराव कदम, सुरज कदम व त्यांचे मित्रपरिवार व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.