तुळजापूर (प्रतिनिधी)- 18 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या 19 वर्षाखालील क्रिकेट निवड चाचणीत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये पृथ्वीराज मिलिंद रोकडे व पारस दत्तात्रय कंदले यांची नांदेड येथे होणाऱ्या विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी धाराशिव संघामध्ये निवड करण्यात आली.
या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मधुकरराव चव्हाण, सचिव उल्हास बोरगावकर, प्राचार्य मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, उपप्राचार्य रमेश नन्नवरे, माजी सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले यांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना प्रा. संभाजी भोसले व प्रा. रत्नाकर उपासे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.