धाराशिव (प्रतिनिधी)- धारासुर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिव या संस्थेची 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात सोमवार दि.23/9/24 रोजी संस्थेचे अध्यक्ष योगेश संभाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सहनिबंधक सच्चिदानंद नाईकवाडी, धनंजय काळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धाराशिव व सहकार प्रशिक्षण अधिकारी मधुकर जाधव लाभले.

संस्थेचे अध्यक्ष योगेश संभाजीराव जाधव व सर्व पाहुण्यांच्या व संचालकांच्या हस्ते गणेश पूजन, लक्ष्मीपूजनाने सभेस सुरुवात झाली. अहवाल वर्षात झालेले सैनिक साहित्य विचारवंत थोर नेते व संस्थेचे दिवंगत सभासद भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कामकाजास सुरुवात झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. संभाजी जाधव यांनी संस्था उभारणीस अनमोल सहकार्य केले. त्यातूनच गोरगरिबांना मदत केली. त्यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे विभागीय सहनिबंधक सच्चिदानंद नाईकवाडी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार अध्यक्ष योगेश जाधव यांनी केला. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धाराशिव धनंजय काळे यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाद पाटील यांनी केला. तर सहकार प्रशिक्षण अधिकारी  यांचा सत्कार शंभू बांगड यांनी केला. संस्थेचे संचालक विधीज्ञ ॲड. प्रसाद जोशी यांची जिल्हाविधीज्ञ मंडळाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार विभागीय सहनिबंधक सचितानंद नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आला

अहवाल वाचन करताना योगेश संभाजीराव जाधव यांनी सांगितले की संस्थेकडे मार्च 2024 अखेर भाग भांडवल 7653069/- झाल्याचे व संस्थेने अहवाल वर्षात 31303458/- इतके कर्ज वाटप केले असून, संस्थेचा निधी रु 27736131.70 इतका असून रु 1600477/- झाला असून सभासदांना 9% लाभांश जाहीर करून नवीन शाखा काढणार असल्याचे सांगितले. सभेत विभागीय सहनिबंधक सचितानंद नाईकवाडी यांनी संस्थेने ठेवीच्या तुलनेत कर्ज वाटप वाढवावे व जुन्या कर्जदारांची वसुली करावी जेणेकरून आपला ताळेबंद स्वच्छ होईल. कर्जदारांनी वेळेवर कर्ज भरण्याचे आवाहन केले. सहकार प्रशिक्षण अधिकारी मधुकर जाधव यांनी संचालक कर्मचारी व सभासद यांना विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचारी संक्षेप ठेव प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक आर. बी. केरकर यांनी केले.

 
Top