भूम (प्रतिनिधी)- येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महायुती सरकारने आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुम हे नाव दिल्याने जैन संघटनेच्या वतीने आनंद व्यक्त केला जात आहे. 

तसेच भुम तालुक्यातील कुंथलगिरी हे जैन समाजाचे प्राचीन धार्मिक स्थळ आहे. येथे महाराष्ट्र व देशातुन हजारो जैन बांधव दर्शनासाठी येतात यामुळे भुम येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव बदलून आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुम हे नाव दिल्याने जैन बांधवातुन आनंद व्यक्त करण्यात येत आहे. महायुती सरकारचे भुम तालुका जैन संघटनेचे अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल, शीतल भाई शहा, अभयकुमार गांधी, विवेक पोकर्णा, स्वप्नील शहा, एखंडे बाहुबली, डॉ शांतीनाथ अंबुरे, प्रदीप आहेरकर आदींनी अभिनंदन केले आहे.

 
Top