तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची  कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवा पुर्वीच्या नऊ दिवसाच्या  देविजींच्या  मंचकीनिद्रेस  मंगळवार दि. 24 सप्टेंबर रोजी राञी प्रारंभ होणार आहे.

पुर्वापार वहिवाटीप्रमाणे श्रीदेविजींची मुर्ती सिंहासनावरुन मंचकी निद्रेसाठी भाद्रपद वद्य  “7“(अष्टमी) शके 1946 रोज मंगळवार दिनांक. 24 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळ 07.00 वाजता पुजेची घाट होवुन 07.30 ते 08.00  ते  असे देविजीस पंचामृत व, शुध्दस्नान घालण्यात येणार आहे. नंतर सव्वा आठ ते साडेआठ पर्यत धार्मिक विधी होवुन राञी 8.30  ते 8.45 देविजीची मुर्ती  मंचकी निद्रेसाठी शेजघरातील चांदीच्या पलंगावर निद्रस्त केली जाणार आहे. नंतर श्रीदेविजींची मंचकावरील पुजा व आरती, धुपारती 09.ते 09.15 करण्यात येणार आहे. नंतर प्रक्षाळ पुजा, नैवेद्य व शेजारती 9.15 ते 9.30 या कालावधीत  होवुन देविजींच्या मंचकीनिद्रेस आरंभ होणार आहे.

 
Top