धाराशिव (प्रतिनिधी)- ज्याप्रमाणे आपण एखादा ठेवीदाराला मान सन्मान देतो  त्याप्रमाणेच  तेवढाच मान सन्मान आपण कर्जदार यांना द्यावा. कारण ठेवीदार आपल्याकडून व्याज घेवून जातो आणि कर्जदार आपणाला व्याज देवून जातो आणि त्यातूनच पतसंस्थेला उत्पन्न मिळते असे सांगितले. त्याचप्रमाणे संस्थेचा कारभार संचालक मंडळाने प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने असावा असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ नेते नानासाहेब पाटील यांनी केले.

प्रगती सहकारी पतसंस्थेची 22 वी वार्षीक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नानासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी बोलताना त्यांनी प्रगती पतसंस्थेला मागील आर्थीक वर्षात संस्थेला 1 कोटी 86 लाख 69 हजार 555 रुपये इतका नफा झाला असुन सभासदांना त्यांच्या भागभांडवलाच्या प्रमाणात 12 % एवढा लाभांष देण्याचे संचालक मंडळाने ठरवल्याचे सांगितले. सर्व सभासदांनी टाळयांच्या गजरात याचे स्वागत केले.

वार्षीक अहवालाचे वाचन करत असताना त्यांनी संस्थेच्या आर्थिक कामगिरीचा लेखाजोखा मांडताना 31 मार्च 2024 अखेर  संस्थेची सभासद संख्या 4960  इतकी झाली आहे. संस्थेला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ऑडीट वर्ग अ मिळाल्याचे संगितले. सभेच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव डॉ. हर्षल डंबळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून माजी सनदी अधिकारी अनिल कवडे, आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे  आणि सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक एस आर नाईकवाडी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष नानासाहेब हरिश्चंद्र पाटील  हे उपस्थित होते. 

अनिल कवडे यांनी सहकार क्षेत्रातील परस्पर सहकार्याची भावना माणुसकीची मूल्य याविषयी उपस्थिताना संबोधित केले. भगवतगीतेतील कर्म योग सांगून संत ज्ञांनेश्वरांनी पसायदानात “जो जे वांच्छिल तो ते लाहो“ अशी प्रार्थना केवळ कुठल्या एक समुहासाठी किंवा कुठल्या जाती धर्मासाठी न मागता संपूर्ण विश्वासाठी मागितल्याचे सांगितले. पुढे बोलतांना पतसंस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेने थकबाकीचे प्रमाण यापेक्षा जास्त वाढू न देण्यासाठी काळजी घेण्याचे सुचविले. एस आर नाईकवाडी यांनी मनोगत व्यक्त केले. 

आभार प्रदर्शन संथेचे उपाध्यक्ष शाम जाधव यांनी केले. या सभेसाठी संस्थेचे संचालक रमाकांत घोडके, शशिकांत वैराळे, नंदकुमार भुतेकर, व्यकंटेश राजे,सुधाकर कुलकर्णी, विजयालक्ष्मी पांढरे, विमल यादव, सविता थोरात आणि संस्थेचे व्यवस्थापक मोहन सावंत त्याचप्रमाणे सभासद मकरंद राजेनिंबाळकर, नितीन भोसले, अँड.डी.डी. मडके, अग्निवेश शिंदे, उमेश राजेनिंबाळकर, दर्शन कोळगे, ऋषीकेश राजेनिंबाळकर,  महादेव थोरात, अविनाश यादव, मनोज पडवळ, व सर्व कर्मचारी वर्ग, संक्षेप ठेव प्रतिनिधी, संस्थेचे कर्जदार, ठेवीदार, सभासद हितचिंतक मान्यवर मोठया प्रमाणावर उपस्थित होते. 

 
Top