तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील कृषि उत्पन्न बाजार समिती तुळजापूरचे मुख्य बाजार आवारात 'नवीन स्वागत कमान प्रवेशव्दारचे' उदघाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे शुभहस्ते शुक्रवार दि. 27 रोजी संपन्न झाले.
यावेळी आमदार पाटील यांचा बाजार समिती तुळजापूरचे संचालक मंडळामार्फत जाहिए सत्कार करण्यात आला. तसेच आडत व्यापारी संघटना तुळजापूर यांचेकडून देखील जाहिर सत्कार करण्यात आला. समिती याप्रसंगी आमदार पाटील यांनी बाजार तुळजापूरचे कमकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच बाजार समितीचे विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे यांनी बाजार समितीचा आढावा सादर केला. यावेळी बाजार समितीच आडते / खरेदीदार व्यापारी, हमाल तोलार बांधव, सर्वच संचालक मंडख तुळजापूर यासह कर्मचारी व तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता: