धाराशिव (प्रतिनिधी)- आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी तालुका धाराशिव मधील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट अंतर्गत एक दिवसाची सहल काढण्यात आली यामध्ये कै.रामलिंग आप्पा लामतुरे  वस्तू संग्रहालय या पर्यटन स्थळाला भेट देऊन तेथील पुराण कालीन वस्तूची माहिती देण्यात आली. 

तसेच प्राचीन जैन मंदिर येथे भेट देऊन जैन धर्मविषयीं व त्यांच्या धर्मगुरू भगवान महिवीर यांच्या विषयी मंदिरातील व्यवस्थाक यांनी माहिती सांगितली, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तेरणा धरणावर नेऊन त्याविषयीं माहिती सांगण्यात आली त्यानंतर , संत गोरोबाकाका मंदिर या पर्यटन स्थळाला विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.तेथे सहभोजनाचा आनंद घेतला. तसेच त्रिविक्रम व उत्तरेश्वर या प्राचीन मंदिरास भेट देऊन पाहणी केली व एकदिवशीय सहलीचा विद्यार्थांनी आनंद लुटला या सहलीत इयत्ता दुसरी ते सातवीच्या एकूण 190 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी, श्रीमती वर्षा डोंगरे, सुनीता कराड, सुलक्षणा ढगे, मंजुषा नरवटे , सत्यशीला म्हेत्रे, राधाबाई वीर, दिनेश पेठे, उत्तम काळे, हनुमंत माने, दादासाहेब कचरे यांनी परिश्रम घेतले. 


 
Top