धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित तेरणाचा राजा या भव्य गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे, स्पर्धांचे आयोजन येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
धाराशिव शहर आणि परिसरामध्ये अत्यंत सुंदर सजावटीने आपले लक्ष वेधून घेणारा तेरणाचा राजा यावर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि परिसरासाठी आकर्षण केंद्रबिंदू ठरला आहे. यावेळी तेरणाच्या राजाची विधिवत स्थापना झाल्यानंतर गणेश आरतीसाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील तसेच आमदार राणाजगजीतसिंह पाटील, पृथ्वीजीतसिंह पाटील आणि मल्हार पाटील, संस्थेचे विश्वस्त बी. बी.वाघ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आर एन शिंदे, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, क्लस्टर हेड विठ्ठल तीकांडे, ड्रग अँड केमिकल चे अध्यक्ष धनाजी आनंदे, ड्रग इन्स्पेक्टर श्रीकांत पाटील आणि जबराट या येणाऱ्या पिक्चरच्या लेखिका, दिग्दर्शिका प्रगती कोळगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने ,गणेशोत्सव संयोजन समितीचे समन्वयक प्रा. पी. एस. तांबारे,सर्व विभाग प्रमुख यांच्या हस्ते स्थापनेपासूनच्या दिवशी करण्यात आली.
यावर्षी आयोजित केलेल्या या तेरणाच्या राजा गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे, कार्यक्रमांचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांनीही याला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. यानिमित्त तेरणा अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण जग गणेशउत्सवानिमित्त डीजेच्या तालावर झुलत असताना येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्थापने दिवशी अभिनव प्रयोग केला असून याच महाविद्यालयाचे विद्यार्थी सागर सलगरे आणि जगदीश सुतार यांच्या टीमने कीर्तनाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना गीत गायन आणि वाद्याची संगतही याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली. यावेळी त्यांचा महाविद्यालयाच्या आणि प्रशासनाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
या गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, फुटबॉल,लगोर, हॉलीबॉल, कॅरम,बुद्धिबळ सारखे खेळ घेण्यात आले असून या स्पर्धेमधून विजेत्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षीस दिले जाणार आहेत. या सर्व खेळाची पाहणी संस्थेचे विश्वस्त मल्हारदादा पाटील यांनी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.