धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील दहिफळ येथील नवतरुण गणेश मंडळ येथील श्री गणेशाची आरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते करण्यात आली. या मंडळाचे हे 51 वर्ष असून या मंडळांनी एक गाव एक गणपती ही योजना गेल्या 51 वर्षापासून अंमलबजावणीत आणलेली आहे. 

श्री गणेशाची आरती झाल्यानंतर गावातील मागील वर्षी मराठा आंदोलनासाठी उपोषणास बसलेले किरण मोहन भातलवंडे यांचा संजय पाटील दुधगांवकर सत्कार केला. याप्रसंगी एमबीबीएस प्रवेश मिळाल्याबद्दल भक्ती पोपट सपाटे हिचा दुधगावकर यांनी तिच्या राहत्या घरी जाऊन आई-वडील आजी आजोबा या सगळ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी दहिफळ गावातील गणेश मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय कागदे, उपाध्यक्ष योगीराज पांचाळ, कृष्णा पाटील, तात्या भातलवंडे, प्रभाकर ढवळे, नारायण भातलवंडे, वसंत मते, पप्पू भातलवंडे, संजय भातलवंडे, खंडू कुठे, फुलचंद काकडे, शेखर पाटील, श्रीकांत काकडे, सोन्या थोरात, श्रीकांत धोंगडे, रंजीत काकडे, अशोक मते, प्रशांत भातलवंडे, तुकाराम भातलवंडे, संजय कोठावळे, राजेंद्र भातलवंडे आदी मोठ्या संख्येने तरुण व बच्चे कंपनी उपस्थित होते.


 
Top