भूम (प्रतिनिधी )- धाराशिव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत रविंद्र हायस्कूलच्या 17 वर्षीय मुलांच्या व 17 वर्षीय मुलींच्या कबड्डी संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. मुलींचा कबड्डी संघ हा तालुक्यातून एकमेव कबड्डी संघ आहे जो विभाग स्तरापर्यंत पोहोंचला आहे.

मुलांच्या कबड्डी संघामध्ये यशोदीप कांबळे,सुजल कुटे, ओम पाटील,मयूर पाटील, साहिल सुरवसे, आदित्य जगदाळे, देवराज येळमकर, अमित राऊत, मोहित माने, पृथ्वीराज पवार, विनायक आहेर, गणेश चौघूले.

तर मुलीच्या कबड्डीसंघामध्ये आर्या खटाळ, राजनंदनी मिसाळ, राधा पवार, सोनाक्षी सानप, सानिका वाघमारे, सायली थोरात, राजश्री लगाडे, सई भडके, राधिका जाधव, आरती शेंडगे, समीक्षा कदम, साक्षी मिसाळ, वैष्णवी बाबर. या खेळाडूंनी भाग घेतला. या खेळाडूंचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या खेळाडूला  पुरुषोत्तम डोंबाळे व अमर सुपेकर कबड्डी कोच यांचे मार्गदर्शन लाभले. यांचाही यावेळी प्रशालेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव आर.डी. सूळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील,पर्यवेक्षकमिलिंद लगाडे तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top