परंडा (प्रतिनिधी) -भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल परंडा बार असोसिएशनच्या (विधीज्ञ मंडळ) वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी परंडा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. दत्तात्रय सुर्यवंशी, कार्याध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, सचिव ॲड. सुनील शिंदे, जेष्ठ विधीज्ञ ॲड. दादासाहेब खरसडे, ॲड. गणेश खरसडे, ॲड. संतोष सुर्यवंशी, ॲड. सुजित देवकते, ॲड. श्रीकांत भालेराव, ॲड. विवेक काळे तसेच सर्व बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.