भूम (प्रतिनिधी)- पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या स्वखर्चातून भूम तालुक्यातील मौजे देवंग्रा येथील बरकडे वस्तीमध्ये पाचशे मीटर रस्ता तयार करण्यात येत आहे. हा रस्ता स्वतः पालकमंत्री यांचे विश्वासू असणारे युवराज कांबळे हे या ठिकाणी उपस्थित राहून काम करून घेत आहेत.
भूम तालुक्यातील मौजे देवंग्रा येथे बऱ्याच दिवसांपासून रस्त्याची मागणी होत होती. हा रस्ता सध्या तरी शासनाच्या वतीने होण्यास दिरंगाई होत असल्याने व सध्या पावसाळी दिवस असल्याने बरकडे वस्ती येथील लोकांना सध्या दैनंदिन वावरण्यासाठी मोठी पराकाष्टा करावी लागत आहे. याची जाण ठेवून पालकमंत्री यांनी क्षणाचाही विलंब न लावता भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून स्वखर्चातून पाचशे मीटरचा देवंग्रा ते बरकडे वस्ती रस्ता तयार करून घेतला. याचे उद्घाटन देवंग्राचे सरपंच विश्वास टकले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम बरकडे ,ॲग्री सुपरवायझर अमोल सुबुगडे, विनोद बरकडे, परमेश्वर बरकडे, सुधीर बरकडे, नाना डोके, तात्या सलगर, आणि देवंग्रा व बरकडे वस्ती वरील नागरिक उपस्थित होते.