भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन व समूह विद्यापीठे शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेत महादेव मुंडेकर यांची निमंत्रीत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल शंकरराव पाटील महाविद्यालय,भूम येथे सत्कार करण्यात आला. 

सत्काराला उत्तर देताना महादेव मुंडेकर यांनी संघटनेचे नेते मेघराज पंडित यांचे आभार व्यक्त केले तसेच या महाविद्यालयाने संधी दिली त्याबद्दल आभार मानले. सत्कार प्रसंगी प्राचार्य डॉ एस. बी. चंदनशिव, प्राचार्य एस एस शिंदे सर, प्रा. तानाजी बोराडे सर, डॉ अनुराधा जगदाळे मॅडम, डॉ नितिन पडवळ, डॉ गोकुळ सुरवसे, प्रा. हरी महामुनी, श्री शहाजी आठवले, श्री. प्रकाश शेंडगे, श्री भास्कर घुले, श्री. कैलास शेंडगे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

 
Top