धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्तींसंग्राम दिनानिमित्त गौर (ता. कळंब) येथील हुतात्मा स्मारकास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी मंगळवारी (दि.17) भेट देऊन श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर हुतात्मा परिवारातील सदस्यांची भेट घेतल. याप्रसंगी माधव देशमुख, जयदीप देशमुख, बापू जाधव, नाना माळी, विजय गिरे, हनुमंत लंगडे, प्रताप केसरे, जयराम मुंढे आदी उपस्थित होते.