परंडा (प्रतिनिधी) - परंडा तालुक्यात खरीप पेरणी मुग, उडीदाची पेरणी मोठया प्रमाणात झाली होती. चांगले उत्पन्न हातात येईल या अपेक्षेने शेतकरी धडपडत होता. परंतु निसर्गाला हे मान्य नव्हते. पावसाने उघड दिली. चांगले उन पडले म्हणून शेतकऱ्यांनी खरीप पिक मुग, उडीद काढला तोच पावसाने सतत हजेरी लावली आणि अक्षरशःसर्व पिक पाण्यात वाहून गेले.

तोंडातला आलेला घास पावसाने घेऊन गेला. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या झालेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.तरी जिल्ह्याचे पालकमंत्री, भूम - परंडा - वाशी तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी तात्काळ पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासन दरबारी तात्काळ कार्यवाही करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

 
Top