तुळजापूर (प्रतिनिधी)-  मालवण मधील राजकोट किल्ल्यावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजयांचा पुतळा उभा करताना झालेल्या चुकीने दुर्घटना घडली. त्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी तहसिलदार यांना निवेदन देवुन केली.

निवेदनात म्हटले आहे कि, मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटना ग्रस्त झाला. हे अत्यंत वेदनादायी असून मनाला संताप आणणारे आहे. केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे दिसुन येते. तरी सरकारने अहोरात्र काम करुन राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि देदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा उभा करावा. या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुध्द अत्यंत कठोर कारवाई करावी. कारवाई करण्यास दिरंगाई केल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला. हे निवेदन तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी, गोकुळ शिंदे, नितीन रोचकरी, दुर्गश सांळुके, सागर सांळुके, संकेत गाजरे, समाधान ढोले, विकी धुगे, अँड. जयवंत इंगळे, संकेत सांळुके  सह अन्य पदाधिकारीनी दिले.

 
Top