तेर (प्रतिनिधी)-  सतत दोन दिवस संततधार पावसामुळे धाराशिव तालुक्यातील तेर येथील गावातून पेठ विभागाकडे जाणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणि आल्याने वाहतूक 2 सप्टेंबरला सकाळपासूनच ठप्प झाली.

27 ऑगष्टला तेरणा धरण पाण्याने पूर्णपणे भरून वाहू लागले आहे. गेले दोन दिवस सतत संततधार पाऊस पडत असल्याने तेर गावातून पेठ विभागाकडे जाणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने 2 सप्टेंबरला वाहतूक ठप्प झाली. नागरिकांनी श्री संत गोरोबा काका मंदिराजवळील पुलावर आपली वाहतूक चालू ठेवली आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेरणा नदीकाठच्या शेतात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. खरीप पिके पाण्याखाली बूडून गेले आहेत.

 
Top