भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील ईट येथील संगमेश्वर मध्यम प्रकल्पामध्ये माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते गुरुवार दि.12 रोजी जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. 

यावेळी बाणगंगाचे संचालक रणजित मोटे, जिल्हा मध्यवर्तीचे उपाध्यक्ष मधुकर मोटे, जि.प.चे माजी सभापती प्रताप देशमुख, बाळासाहेब मोटे, मनोहर देशमुख, वलीमहंमद काझी, सुभाष वेदपाठक, सोनेवाडीचे सरपंच सतिष सोने, ईटचे सरपंच संजय असलकर, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सुनील देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य काकासाहेब चव्हाण, युवा नेते भाऊसाहेब चोरमले, ग्रा.प.माजी सदस्य अविनाश चव्हाण, लहुराज भोईटे, मानव मोटे, चिंतामणी लिमकर, युवराज पाटील, राजाभाऊ हुंबे, माजी सभापती शिवाजी जालन, अर्जुन सुळ, सुचित सातपुते, इनामदार यांच्यासह परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच तालुक्यातील वंजारवाडी, सोनगिरी, वाकवड हे प्रकल्प ही पूर्ण क्षमतेने भरले असल्याने या प्रकल्पाचेही जलपूजन माजी आमदार राहुल मोटे यांनी केले आहे.

 
Top