धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील माऊली चौक येथील श्री माऊली तरूण गणेश मंडळाच्यावतीने यंदा वेगवेगळ्या शाळांतील एक हजार विद्यार्थ्यांना आकाशातील गृह, तारांगणाचे दर्शन घडविण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील अंधश्रध्दा कमी होवून वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यास मदत होणार आहे.

धाराशिव प्रशालेत शनिवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक माढेकर, पत्रकार उपेंद्र कटके, बाबुराव चव्हाण, शितल वाघमारे, धाराशिव प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. मागील तीन दशकांपासून श्री माऊली तरूण गणेश मंडळाच्यावतीने दरवर्षी विविध सामाजिक, वैज्ञानिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्रातील विविध संकल्पना, अवकाशातील ग्रह, तारे, ग्रहण, सूर्यमंडळ यांची माहिती थ्रीडी तंत्रज्ञानामध्ये उभारलेल्या डोममध्ये दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पोलाद या कंपनीच्या सहकार्याने विविध शाळांतील एक हजार विद्यार्थ्यांना मंडळाच्यावतीने मोफत तारांगण राबविण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष नितीन किशोर मुंडे, उपाध्यक्ष अनिल बाळासाहेब मुंडे, सचिव ॲड. मंगेश गाजरे, कोषाध्यक्ष विनोद मुंडे, रवि मुंडे, संताजी मुंडे, कार्याध्यक्ष अभिजीत मुंडे, प्रथमेश पाटील, हरिओम मुंडे, वैभव प्रवीण मुंडे, सुनील मुंडे, प्रशांत मुंडे यांनी परिश्रम घेतले.


 
Top