तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे हिंदी दिनाचे औचित्य साधून तुतारी भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करुन हिंदी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार यांच्या हस्ते तुतारी भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हिंदी भाषेची वैश्विकता या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हिंदी सप्ताहतंर्गत हिंदी निबंध स्पर्धा, छात्र काव्य संमेलन, कथा वाचन स्पर्धा, हिंदी वादविवाद स्पर्धा आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मंत्री आर आडे यांनी केले. सदर प्रसंगी डॉ.नेताजी काळे, डॉ. सी. आर. दापके, डॉ.अनंता कस्तुरे, डॉ. एफ. एम. तांबोळी आदीसह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार हिंदी विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद चव्हाण यांनी मानले.