धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हयातील ढोकी-येडशी राष्ट्रीय मार्ग क्र. 63 संदर्भात कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर व आळणी टी. पाँईन्ट ते ढोकी ( 23) कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, धाराशिव यांना मी स्वत: व कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी वारंवार सुचना देवून देखील दुरुस्ती करण्यात आली नाही. उपरोक्त दोन्ही रस्त्यांवरती अपघात व चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. सदर रस्ते दुरुस्ती विषयी दि. 18/09/2024 रोजीपर्यंतची पत्राव्दारे मुदत दिली आहे. दिलेल्या मुदतीत दुरुस्ती न झाल्यास ढोकी येथे दि. 26/09/2024 रोजी ढोकी चौक येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अखंड रस्ता रोको आंदोलने करण्यात येणार आहे.